श्री शिवाजी महाविद्यालयातील एनसीसीच्या सहा विद्यार्थ्यांची अग्निवीरसाठी निवड

परभणी(१८) नुकत्याच संभाजीनगर येथे झालेल्या सैन्यभरतीत अग्नीवीर म्हणून येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
निवड झालेले सहाही विद्यार्थी एनसीसीच्या (राष्ट्रीय छात्रसेना) कॅडेट्स आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवार (दि.१७) रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे तसेच विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ यांची उपस्थिती होती.
अग्निवीरसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये खाडे धम्मधर,घाटगे दिपक,बोकारे आदिनाथ,गलांडे राहुल,भालेराव गंगाधर आणि तडवी पठाण अमर यांचा समावेश आहे. चालू शैक्षणिक वर्षांपासून मुलींसाठी एनसीसीचे युनिट सुरू झाले आहे. प्रवेशित विद्यार्थिनींना उपस्थितांच्या हस्ते युनिफॉर्म वाटप करण्यात आले. सत्कार प्रसंगी प्राचार्य डॉ.जाधव यांनी भरती झालेल्या कॅडेटसचे कौतुक केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देताना म्हणाले, महाविद्यालयाच्या छात्रसेनेचे कॅडेट्स दरवर्षी सातत्याने भरती होत आहेत. देशसेवेसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे असे गौरवोद्गार काढले.
यावेळी ५२ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेना नांदेडचे कमाडिंग ऑफिसर कर्नल रंगाराव यांनी दूरध्वनी द्वारे भरती झालेल्या कॅडेटसना विशेष शुभेच्छा देऊन कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंडर ऑफिसर अभिषेक भोसले, धनराज गुट्टे, सार्जंट चक्रधर जावळे आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी छात्रसेनेचे कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची अग्निवीरसाठी निवड झाली.त्याबद्दल त्यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, डॉ.श्रीनिवास केशट्टी, डॉ.विजया नांदापुरकर, डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.प्रशांत सराफ दिसत आहेत.

श्री शिवाजी महाविद्यालयात”वैज्ञानिक आपल्या भेटीला उपक्रम

संशोधन छात्रवृत्तीच्या सहाय्याने वैज्ञानिक होण्याच्या अनेक संधी
-वैज्ञानिक डॉ.अंबादास रोडे यांचे प्रतिपादन

परभणी (१६) राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक विभागाच्या वतीने विज्ञान शाखेच्या विविध विषयातील विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी संशोधन शिष्यवृत्ती सुरू केल्या आहेत. या संधीचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन दिल्ली येथील क्षेत्रीय जैव प्रौद्योगिकी केंद्राचे वैज्ञानिक डॉ.अंबादास रोडे यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या ‘वैज्ञानिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत ‘संशोधनातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शुक्रवार (दि.१६) रोजी आयोजित या विशेष व्याख्यान कार्यक्रमासाठी विभागप्रमुख डॉ.सुभाष लोणकर, प्रसिद्धी प्रमुख डॉ.जयंत बोबडे, डॉ.सुरज आडे, डॉ.नानासाहेब शितोळे, डॉ.गंगाधर गुंडलेवाड, डॉ. प्रवीण जगताप, प्रा.प्रशांत विभूते, प्रा.माधव जाधव आदींची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना डॉ.रोडे पुढे म्हणाले, मी ग्रामीण भागातून आलो आहे कसल्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता शिकत गेलो. संशोधनासाठी शासनाच्या उपलब्ध आलेल्या शिष्यवृत्तीच्या बळावर संशोधन करू शकलो. संशोधन मानवीय अस्तित्वासाठी आवश्यक आहे त्यासाठी अनेक राष्ट्रे पुढाकार घेताना दिसत आहेत. अशावेळी रसायनशास्त्रासारख्या विषयातील विद्यार्थ्यांनी काळाची पाऊले ओळखून संशोधन क्षेत्राकडे वळावे. काळाची गरज लक्षात घेता अंतरविद्याशाखीय संशोधनाकडे कसे जाता येईल याचाही विचार विद्यार्थ्यांनी करावा असे ते म्हणाले.त्यानंतर त्यांनी सीएसआयआर,जेआरएफ,डीएसटी,डीबीटी,आयसीएमआर आदी शिष्यवृत्ती देणाऱ्या संस्थांची विस्ताराने माहिती दिली. डॉ.रोडे परभणीचे भूमिपुत्र असल्याने त्यांचा आपल्याला अभिमान आहे असे गौरवोद्गार डॉ.एस. एम.लोणकर यांनी काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नानासाहेब शितोळे, प्रास्ताविक डॉ. सुभाष लोणकर तर आभार प्रदर्शन डॉ.प्रशांत विभूते यांनी केले.

श्री शिवाजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी वैज्ञानिक डॉ.अंबादास रोडे आले असता त्यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. सुभाष लोणकर, डॉ.जयंत बोबडे, डॉ. सुरज आडे, डॉ.नानासाहेब शितोळे, डॉ.जी.बी.गुंडलेवाड आदी दिसत आहेत.
संविधान दिन आणि छत्रसेना दिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, डॉ.तुकाराम फिसफिसे, डॉ. संतोष कोकीळ आदी दिसत आहेत.

श्री शिवाजी महाविद्यालयात ७० स्वयंसेवकांनी केले रक्तदान

परभणी (२९) येथील श्री शिवाजी महाविद्यालयात भारतीय संविधान आणि राष्ट्रीय छात्रसेना दिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात ७० स्वयंसेवकांनी रक्तदान केले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग तसेच वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले. याप्रसंगी त्यांनी रक्तदानाचे महत्व सांगून सशक्त तरुणांनी रक्तदान करणे मानवी संस्कृतीसाठी आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ. विजया नांदापुरकर,
जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. कौसडीकर आदींची उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ, डॉ.तुकाराम फिसफिसे,डॉ. संतोष कोकीळ, डॉ.दिगंबर रोडे, प्रा. राजेसाहेब रेंगे, गणेश गरड आदींनी परिश्रम घेतले.

विद्यापीठस्तरीय स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय प्रथम

चार जिल्ह्यातील संघांचा सहभाग

परभणी (१७) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने शनिवार (दि.१७) रोजी घेण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संघाने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने विद्यापीठाने चार जिल्ह्यतील महाविद्यालयासाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत परभणी, हिंगोली, नांदेड तसेच लातूर या जिल्ह्यातील जिल्हा फेरीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या अशा बारा संघांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. शनिवारी विद्यापीठाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती दिन संग्राम दिनाच्या निमित्ताने ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाच्या संघाने ‘सतरंगी रंगो का उज्वलसा देश हमारा’ हे देशभक्तीपर समूहगीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. या संघास संगीत विभाग प्रमुख प्रा.सविता कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले तर बळीराम कौसईतकर, शुभम गोंधळी,रामदास कुलकर्णी आदींनी साथसांगत केली. सदरील संघात कांबळे मधूप्रिया,भोसले संजीवनी,पैंजने अभिरुपा,पाटील होळंबे,साखरे गायत्री, कुलकर्णी मनोज आदी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ रोहिदास नितोंडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.जयंत बोबडे, डॉ.प्रल्हाद भोपे, डॉ.दिगंबर रोडे तसेच प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाने प्रथम बक्षीस मिळवले. बक्षीस वितरित करताना कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्रा.सविता कोकाटे आणि विद्यार्थी दिसत आहेत.

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने संजय मुंढे यांचा सत्कार

परभणी (२२) परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात खो-खो प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय मुंढे यांनी नुकताच हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून अतिरिक्त भार स्विकारल्याबद्दल श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुंढे हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांची जिल्हा क्रीडा अधिकारीपदी नेमणूक झाल्याने माजी विद्यार्थी म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. नक्कीच ते आपल्या कार्यशैलीतून स्वतःचा आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवतील असे गौरव उदगार यावेळी प्राचार्य डॉ.जाधव यांनी काढले.
सत्कार प्रसंगी डॉ.जयप्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ.संतोष कोकीळ, प्रा.राजेसाहेब रेंगे आदींची उपस्थिती होती.

फोटो कॅपशन : संजय मुंढे यांची हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करताना प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, डॉ.जयप्रकाश गायकवाड, डॉ.संतोष कोकीळ, प्रा.राजेसाहेब रेंगे आदी दिसत आहेत.

श्री शिवाजी महाविद्यालयात माजी सैनिकांचा सन्मान

कारगिल दिवस शहीदांना श्रध्दांजली

परभणी (२७) येथील श्री शिवाजी महाविद्यालयात २३ व्या कारगिल दिवस निमित्ताने भारतीय सैन्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत शहरातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
कारगिल दिवसाच्या औचित्याने मंगळवार (दि.२६) रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने कारगिल युद्धात शाहिद झालेल्या हुतात्म्यांना श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते माजी सैनिक कॅप्टन किशन बाळस्कर, सुभेदार मेजर एस. एम. कुबडे, हवलदार रामराव गायकवाड, नाईक नवनाथ डोळे आदी माजी सैनिकांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस कारगिल युद्धात शाहिद जवानांना श्रध्दांजली अर्पित करत दोन मिनिटांचे मौन बाळगून अमर जवान प्रतिकृतीस मान्यवरांनी पुष्पांजली अर्पित केली. शेवटी उपस्थितांनी घोषणा दिल्या.
सदरील कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, राष्ट्रीय छात्रसेना विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ, प्राध्यापक तसेच कॅडेटस उपस्थित होते.

श्री शिवाजी महाविद्यालयात कारगिल दिवसाच्या निमित्ताने शहरातील माजी सैनिकांचा सत्कार प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सैनिक कॅप्टन किशन बाळस्कर, सुभेदार मेजर एस. एम. कुबडे, हवलदार रामराव गायकवाड, नाईक नवनाथ डोळे, डॉ.श्रीनिवास केशट्टी, डॉ.विजया नांदापुरकर, डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.प्रशांत सराफ आदी दिसत आहेत.

Degree Distribution Programme 2022

शिक्षणाने माणसाचे परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार होते

-प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांचे प्रतिपादन

श्री शिवाजी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न

परभणी (२३) पशु आणि माणसात अनेक संदर्भात साम्य आहेत. परंतु बुद्धी आणि माणुसकीचा धर्म माणसाला पशुपेक्षा वेगळा ठरवतो. हा माणुसकीचा धर्म शिक्षणातून विकसित होऊन माणसाचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण करतो असे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.
श्री शिवाजी महाविद्यालयाचा २४ वा पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम शनिवार (दि.२३) रोजी संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव तर प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ. विजया नांदापूरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. रोहिदास नितोंडे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ.तुकाराम फिसफिसे, डॉ.जयंत बोबडे, डॉ.प्रशांत सराफ, डॉ. संतोष कोकीळ, डॉ.दिगंबर रोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.बिसेन पुढे म्हणाले, कोणत्या पद्धतीने जीवन जगायचे आहे ते विद्यार्थ्यांनी विवेकाने ठरवावे. कोणतीही विचारधारा बाळगा पण समाज आणि देशाला हिताचे ठरेल असे कार्य करा असे आवाहन करत पुढे म्हणाले विद्यापीठ परिक्षेत्रातील दर्जेदार महाविद्यालय म्हणून श्री शिवाजी महाविद्यालय परिचित आहे. कोणतेही उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात महाविद्यालयाचा नावलौकिक आहे. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले, श्री शिवाजी महाविद्यालय विद्यार्थ्यांना फक्त पदवीचं शिक्षणचं देत नाही तर विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेले बळ आणि नैतिक मूल्य सुद्धा देते. महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी घडवले राजकीय शैक्षणिक, वैज्ञानिक, संशोधन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ते आज अतुलनीय काम करत आहेत. तंत्रज्ञान, बदलत्या जगामध्ये नैतिक मूल्यासह बदलत्या जगाचे चित्रही त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम महाविद्यालय करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनासह विद्यापीठ आणि महाविद्यालय गीताने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मुख्य इमारतीपासून दीक्षांत मिरवणूक निघाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ५७६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तुकाराम फिसफिसे, सूत्रसंचालन प्रा.रामप्रसाद देशमुख तर आभार प्रदर्शन डॉ.जयंत बोबडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.सुरेंद्र येनोरकर,डॉ.राजू बडुरे, डॉ.मदन परतूरकर, डॉ.सुरज आडे, रवी तिळकरी, कालिदास भागडे, केशव कैलेवाड आदींनी पुढाकार घेतला. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करताना प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, मंचावर हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, डॉ.श्रीनिवास केशट्टी, डॉ.विजया नांदापुरकर, डॉ रोहिदास नितोंडे, डॉ तुकाराम फिसफिसे, डॉ.प्रशांत सराफ, डॉ.जयंत बोबडे, डॉ.संतोष कोकीळ, डॉ.दिगंबर रोडे आदीं दिसत आहेत.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, मंचावर हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, डॉ.श्रीनिवास केशट्टी, डॉ.विजया नांदापुरकर, डॉ रोहिदास नितोंडे, डॉ तुकाराम फिसफिसे डॉ.प्रशांत सराफ, डॉ.जयंत बोबडे, डॉ.संतोष कोकीळ, डॉ.दिगंबर रोडे आदीं दिसत आहेत.

aa

aadadad