विद्यापीठीय बास्केटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचा संघ अव्वल

परभणी (०१) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद प्राप्त करत अव्वल येण्याचा मान मिळवला आहे.
नुकतीच पूर्णा येथील श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयात ही स्पर्धा संपन्न झाली. सदरील स्पर्धेत बहुसंख्य संघांनी सहभाग घेतला होता. या विजयाने बास्केटबॉल सारख्या खेळात देखील दबदबा निर्माण करायला सुरुवात केली आहे. या संघात गणेश दराडे(कर्णधार), मानव माने,कृष्णा मंगवानी, अनिल डवरे, गणेश सौदागर मंडलिक अंकित , सचिन गोचडे, अभिषेक शिंदे,हनुमान चव्हाण, शेख अमन या खेळाडुंचा समावेश होता.
विजयी संघास क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.संतोष कोकीळ, प्रा. राजेसाहेब रेंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
संघाच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी,उपप्राचार्या डॉ. विजया नांदापूरकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे , गणेश गरड तसेच प्राध्यापक तथा प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *