विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
परभणी (२५) येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना विभाग (एनसीसी) आणि नांदेड येथील ५२-महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेना यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी छात्रसेनेच्या कॅडेट्सची भरती प्रक्रिया दिनांक २५ (मंगळवार) रोजी विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादात संपन्न झाली.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, देशप्रेम आणि सैन्यात जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त बनविण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय छात्रसेनेची महत्वाची भूमिका असते. या भरती प्रक्रियेत एकूण २८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यापैकी ७० विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.
सदरील भरती प्रक्रियेत मुलींच्या युनिटसाठी अकरावी तसेच पदवी प्रथम वर्षातील विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.
भरती प्रक्रियेसाठी नांदेड येथील ५२-महाराष्ट्र बटालियनचे कर्नल एम.रंगाराव,हवालदार दशरथ कटरे,हवालदार योगेशकुमार यांच्या निरीक्षणाखाली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव,उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण झाली.
ही भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ,शिरीष जयपूरकर, डॉ.जयंत बोबडे, डॉ.तुकाराम फिसफिसे, डॉ.संतोष कोकीळ, डॉ.राजू बडूरे, डॉ.प्रल्हाद भोपे, प्रा.राजेसाहेब रेंगे,सादिक शेख, साहेब येलेवाड आदींनी परिश्रम घेतले.