परभणी(१३) येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा.माधव जाधव यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडच्या वतीने रसायनशास्त्र विषयात पीएच.डी.प्रदान करण्यात आली. त्यांनी डॉ. शिवराज सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली 'सिंथेसिस, कॅरक्टरायझेशन अँड बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन ऑफ सम नाॅवेल फ्युझड पिरीमिडीन अँड थायाझिन हेटिरोसायकल्स' या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, शिक्षक संघटनेचे केशवआण्णा दुधाटे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य इंजि. नारायण चौधरी, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, प्रबंधक विजय मोरे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.सुभाष लोणकर तसेच प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.