डॉ.रोहिदास नितोंडे यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट युवा संशोधक प्राध्यापक पुरस्कार प्रदानपरभणी (१०) येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ.रोहिदास नितोंडे यांना सोमवार (दि.१०) रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चा उत्कृष्ट युवा संशोधक प्राध्यापक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार विद्यापीठ परीक्षेत्रातील महाविद्यालयातील संशोधन करणाऱ्या तरुण संशोधक प्राध्यापकाला दरवर्षी दिला जातो. डॉ.नितोंडे यांची विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्यांनी मागील अनेक वर्षांपासून केलेल्या संशोधन कार्याची दखल घेत विद्यापीठाने हा पुरस्कार प्रदान केला आहे. सदरील पुरस्कार वितरण माजी पोलीस महासंचालक डी. जी.पसरीचा, साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर,कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. डॉ.नितोंडे यांच्या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापूरकर, प्रबंधक विजय मोरे आदींनी अभिनंदन केले.
फोटो कॅपशन: श्री शिवाजी महाविद्यालयातील डॉ.रोहिदास नितोंडे यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट युवा संशोधक प्राध्यापक पुरस्कार वितरित करताना डी. जी.पसरीचा, जयप्रकाश दांडेगावकर,कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांच्यासह सुषमा नितोंडे, सर्वेश नितोंडे आदी दिसत आहेत.